मी पुढील काही आठवडे उत्साही मित्रांच्या मदतीसाठी ब्लाॅग पोस्ट करणार आहे. हे निरामय_आरोग्यवर्धिनी ह्या हॅशटॅगसोबत टाकले जातील हे लक्षात असु द्या. नविन वर्षीच्या संकल्पांमुळे व्यायामावर सध्या बऱ्याच जणांचा भर दिसतोय. बऱ्याच लोकांचा विशेष जोर हा वजन कमी करणे किंवा पोट कमी करणे ईथे दिसतोय. त्यावर अनेक लोक मनापासून सल्ले देतायेत. अनुभव वाटतायेत. आनंद आहे. परंतु एक लक्षात ठेवा. प्रत्येक देह हा वेगळा असतो. त्याचा पिंड वेगळा. प्रत्येक उपायांना प्रत्येक शरीर सारखाच प्रतिसाद देईल असे नाही. त्यातल्यात्यात, एक तत्व लक्षात ठेवा. जर नियमित कानाकोपऱ्यातली धुळ काढली तर दिवाळीच्या सफाईला फार वेळ लागत नाही. तसेच जर तुमच्या शरीरावर मेद (चरबी) वर्षानुवर्ष जमु दिली, स्नायुंना घामाची सवय न ठेवता गरजेपेक्षा जास्त आराम दिला किंवा दिनचर्येचे बारा वाजवले तर तुमच्या शरीराला रुळावर यायला वेळ लागेल. तो शाश्वत बदल हा काही वर्षात येतो. कारण जुन्या सवयी जाऊन नविन सवयी रुळायला वेळ लागणारच. सर्वात आधी मला अमक्या महीन्यात तमके वजन करायचे हा प्रण मनातून काढुन टाका. कारण तसले प्रण/प्रतिज्ञा तुम्हाला अघोरी उपाय करायला भाग पाडतील. असे उपाय नियमित करता येत नसल्याने तुम्ही वजन कमी व पुन्हा जास्त होण्याच्या चक्रात अडकतात. तिथे केवळ निराशा हाती लागते. त्यात वरुन शरीराची नेहेमीकरता हानी होते. तुमच्या वजनाची तुमच्या वयानुसार किंवा ऊंचीनुसार अपेक्षा ठेवणेही पुर्णतः योग्य आहे असे नाही. कुणाची अंगकाठी वजनदार हाडांची असते कुणाच्या वजनात चरबीचे प्रमाण जास्त असते. तसेच जी चरबी सगळ्यात आधी येते ती सगळ्यात शेवटी जाते. पोटावर चरबी आधी चढते. परंतु शरीर चरबी वापरतांना आधी हातावरील, मग पाय/मांडी व नंतर पोटाच्या चरबीकडे मोर्चा वळवते. प्रत्येकाचा मेटाबाॅलिझम (अन्नाचे उर्जेत रुपांतर करण्याचा) रेट हा देखील वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येकाला लागणारी भुक व एकुण आहार हा देखील एकसारखा असु शकत नाही. सध्याची आरोग्यव्यवस्था ही सगळ्या सोम्यागोम्यांना एकाच मापाच मोजते. तुम्हाला सांगितली गेलेली रक्तदाबाची आवश्यक पातळी देखील तुमच्या शरीरासाठी अचुक नसुन ती एक रफ सरासरी रेंज आहे. त्या रेंज नुसार तुम्ही हायबीपी असुनही सुधृढ असु शकता. तेच गणित नाडी गतीचे किंवा हार्टबिटचे. हेल्थी बीपी, हार्टबीट, फॅट परसेंटेज हे डाॅक्टरांनी ठरवलेले सरासरी मापदंड असुन ते तुमच्या शरीराला फिट बसवण्याचा अट्टहास करु नका. सरासरी मधे प्रत्येक जीवाचा देह बरोबर मधे असला तरच उत्तम आरोग्य/ हेल्थी असे नाही. पुढील एक गोष्ट लक्षात असु द्या. तुमचे शरीर हे प्रचंड मेहनत करण्यास सशक्त आहे व निसर्गाने ते तसे घडवलेच आहे. सर्वात जास्त अजड (लवचिक) जगात देवाने काय निर्माण केले आहे तर ते मानवी शरीर. आणि सर्वात जास्त जडत्व/ताठर असलेले देवाने काय निर्माण केले आहे तर ते मन. होय मनाचे जडत्व सर्वात जास्त म्हणजे लवचिकपणा सर्वात कमी. त्याला वेसण घालुन नियंत्रणात ठेवणे याला पराकोटीचे कष्ट लागतात. परंतु तुमच्या दिनचर्येत अनुशासन (discipline) येण्यासाठी हे नियंत्रण आवश्यक आहे. शरीराची चालणारी हेळसांड दिनचर्येत अमुलाग्र बदल केल्याशिवाय थांबणे अशक्य आहे.
आरोग्याच्या व्याख्येत मुळात तुम्ही तिन भाग करा. पहीला भाग हा मानसिक आरोग्याचा ठेवा. दुसरा भाग आहाराचा ठेवा. तिसरा भाग शारीरीक मेहनतीचा ठेवा. हे भाग मी त्यांच्या महत्वानुसार रचले आहेत. दिनचर्येचा सोपस्कार हा पहील्या भागात येणार आहे. पुढील ब्लाॅगमधे मी भागांच्या व्याख्या व अपेक्षा तसेच आत्मनिरीक्षणाचे विवरण करणार आहे. मुख्य हेतु हा आहे की तुम्ही स्वतःच्या आरोग्याबाबतीत आत्मनिर्भर व्हावे. हा ब्लाॅग वाचल्यावर तुम्हाला एक गृहपाठ आहे.
1. आपल्या दिनचर्येची सध्या असलेली रुपरेषा लिहुन काढा. त्यात तुम्ही किती वेळ स्क्रिनवर असता, काय खाता, कितीवेळ पुस्तक वाचता, किती वेळ टिव्ही पाहता, कोणते कार्यक्रम पाहता, बाहेर कितीदा जेवता (टेकअवे धरुन), कधी उठता, कधी झोपता, मानसिक आरोग्यासाठी काय साधना, काम, वाचन, योग... करता, तुमच्या दिवसभरात तुम्ही आनंदी केव्हा असता. दुःखी केव्हा असता. डिप्रेशन किंवा चिंतेचे सावट मनावर कधी येते हे लिहा. शारीरीक संबंध कितीदा ठेवतात. तुम्हाला असलेले छंद व त्यासाठी तुम्ही किती वेळ देतात. गाडीचा वापर किती करता (किती किमी पर्यंत पायी जाण्याची तयारी असते). तुम्हाला असलेल्या व्याधी, व्यसनं. ह्या गोष्टींची नोंद त्यात करा. साधारण २-३ पानांची रुपरेषा अपेक्षित आहे.
पुढील भागात गृपमधे मी अजुन काही माहीती, सुचना व गृहपाठ देणार आहे. तुम्ही माझ्या ब्लाॅगचा लाइक करण्या पेक्षा जास्त प्रत्यक्षात उपयोग करणे मला अपेक्षित आहे. त्यासाठी प्रत्येक भागात दिलेला गृहपाठ हा महत्वाचा आहे. मुद्दामच ही लेखाची सिरीज (गृहपाठाव्दारे)प्रात्यक्षिकं यांवर भर देणारी आहे.
#क्रमशः
#निरामय_आरोग्यवर्धिनी
© राहुल करुरकर
No comments:
Post a Comment