#निरामय_आरोग्यवर्धिनी - ३.१
आपण पहिल्या लेखात आरोग्याचे प्रामुख्याने तिन भाग केले. मानसिक आरोग्य, आहार व शारीरीक आरोग्याचा/मेहनतीचा असे हे तिनभाग आहेत. प्रत्येक भागाचे मुल्यमापन आपल्याला करायचे आहे.
- मानसिक आरोग्याचे मुल्यमापन - लेख ३.१
- आहाराचे मुल्यमापन - लेख ३.२
- शरीराचे मुल्यमापन - लेख ३.३
हा लेख केवळ ३.१ आहे. पुढील ३.२,३.३ लवकरच येतील.
मानसिक आरोग्याचे मुल्यमापन
तुम्ही जोपर्यंत तुमच्या आरोग्यास काही निकष लावत नाहीत तोपर्यंत तुमच्या आरोग्याचे मुल्यांकन करता येत नाही. कुठलीही गोष्टतुमच्याकडे किती आहे किंवा नाही हे कळाल्याशिवाय तुमच्या प्रयत्नांना कुठवर पळायचे आहे आणि कुठल्या बाजुने पळायचे आहे हेकळणार नाही. त्यामुळे पुढील लेख आपण आरोग्याच्या तीन भागांचे (मानसिक, आहार व शरीर) मोजमाप लिहिणार आहोत. एकदातुमचे स्वतःच्या शरीराबाबतीत सखोल संवेदना न ज्ञान जागृत झाले की मग आपण अथक परिश्रमाने आरोग्यास निरामय करणारआहोत. निरोगी मन, शरीराची साथ असल्याशिवाय तुम्ही इतर ऐहिक किंवा अध्यात्मिक प्रगती करु शकत नाहीत.
संतवाणी जेव्हा ॥ मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण ॥ म्हणते, तेव्हा त्यांचा अनुभव त्यामागे असतो. कृष्ण गीतेत कर्मयोग ह्यातिसऱ्या अध्यायाच्या शेवटी म्हणतो :
इंद्रियांनी परान्याहुर इंद्रियाभ्ये परम मनः
मनासाऽतु परम बुद्धीर यो बुद्धे परतस्तु सः॥
त्याचा अर्थ स्थुल शरीरापेक्षा इंद्रिये श्रेष्ठ, इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ व बुद्धी पेक्षा आत्मा श्रेष्ठ.
मनाचे नियंत्रण हे तुम्हाला शरीराच्या आरोग्यात उपयोगी येईलच. परंतु मनाचे नियंत्रण हे तुम्हाला बुद्धी समतोल नितीमत्तेच्या मार्गानेनेण्यास व आत्मा मुक्तीच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रवृत्त करते.
जरी आपण खाली मानसिक पातळी मोजमाप सध्या घेत असुत तरी, तेवढीच तिक्ष्ण नजर आपण शरीराच्या मोजमापावर तसेचआहाराच्या मोजमापावर घालवणार आहोत. मानसिक आरोग्य हे महत्वाचे आहे हे वाक्य ह्या लेखाच्या सिरीजमधे सतत आढळणारकारण ते माझ्या स्वतःच्या तसेच अनेक महानुभावांच्या अनुभवात आहे. जसे शरीराची जडणघडण तिचा आहार घडवते, तशी मनाचीजडणघडण मनाचा आहार घडवते. मनाचा आहार कुठला?
- विचार: तुम्ही मनास कुठले विचार भरवतात? आता विचार कुठुन येतात हे समजावुन घ्या? ते अगदीच random नसतात. त्यांच्यामागे तुम्ही कुणासोबत असतात, काय पाहतात, काय करतात, काय वाचतात हे आहेत. तुमच्या वासना, षड्रिपु तसेच इंद्रीये सततहे विचारांचे अन्न पुरवण्यास तुम्हाला प्रवृत्त करतात. तुमची संगत (कुणासोबत असता?) , त्यांची मानसिक व वैचारिक स्थिती हितुमच्या विचारांची दिशा प्रभावित करते. हे कळाले की आपल्याला एक समाधान मिळेल की मनाचे अन्न म्हणजे विचार बदलतांयेते आणि अन्न बदलले की मनाची स्थिती बदलली म्हणुन समजा. खालील गृहपाठाचे प्रश्न तुम्हाला मनाचे अन्न कुठुन शिरतेह्याचा मार्ग दाखवेल. तसेच ते विचार व त्यांचे परिणाम तुम्हाला कुठे दिसु येतात हे कळायला मदत करतील.
गृहपाठ:
मानसिक आरोग्याचे विश्लेषण करतांना खालील काही संकेत तुम्हाला आढळतात का व तुम्ही त्याचे निरीक्षण करु शकता का? आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या निरामयच्या वहीत किंवा मोबाईल मधे व्यवस्थित लिहुन ठेवायची आहेत. शक्यतो प्रत्येकउत्तरानंतर काही ओळी सोडुन द्या. या प्रश्नांची उत्तरे तुम्ही दर महिन्याच्या शेवटी पुन्हा देणार आहात. त्यात तुम्हाला तुमची (झालेली/नझालेली) प्रगती दिसणार आहे.
तुम्हाला कुठल्या बाबींवर प्रगती करायची आहे हे तुम्ही ठरवायचे आहे. त्याचा विचार केल्यावर तुमच्या वैयक्तिक स्थितीस अनुसरुनआपण काही ठोस पाऊल उचलणार आहोत. प्रगतीच्या बाबी ठरवण्यासाठी तुम्हाला मदत हवी असल्यास मी व्यक्तिगत मदत करण्यासवेळ उपलब्ध असेल तसा तयार आहेच.
चला तर खालील प्रश्न समजावुन घेऊत व त्यांची उत्तरे स्वतः शोधुया.
- तुम्ही एकट्यात वेळ घालवल्यावर घाबरता किंवा अस्थिर असता का (डिप्रेशन येते का?) ? का शांत व स्थिर मानसिक स्थितीतअसतात?
- सकाळी उठण्यात निरुत्साह नियमित आढळतो का?
- टिव्ही किंवा इतर ठिकाणच्या बातम्या व घटना तुम्हाला व्यथित करतात का? त्यानंतर तुम्ही तुमची निराशा किंवा राग किंवाअसाह्यता यांना कसा मार्ग देता?
- मन सतत भविष्याच्या चिंतेत किंवा भुतकाळाच्या पश्चातापात गुंतते का?
- मोबाईल व इतर स्क्रिन (टिव्ही.. इत्यादी) यांचे शिवाय किती दिवस/वेळ राहु शकतात? नियमीत स्क्रिनचे उपवास करता का?
- तुम्ही एखादा विचार करत असतांना मन नेहेमी भरकटत जाऊन दुसऱ्या विषयाकडे जाते का? तुम्हाला एकाग्रतेचा अभाव जाणवतोका?
- गोष्टी विसरायला होते का? कुलुप लावले असुन ते पुन्हा चेक करायला जातात का? किंवा सतत कुलुप व्यवस्थित लागले असेलका या चिंतेत असतात?
- तुम्ही कुठल्याही विचाराचे समर्थन किंवा विरोध करतांना स्वतःवरचे नियंत्रण गमावता का?
- रस्त्याच्या रहदारीत तुम्ही मनाचा त्रागा करुन घेता का?
- तुमच्या मनाची ढळलेली शांती पुन्हा येण्यास किती वेळ लागतो? राग शांत व्हायला किती वेळ लागतो?
- इतर व्यक्तिंच्या विचांराचा किंवा नकारात्मक वृत्तींचा तुमच्यावर परिणाम होतो का? का तुमचा त्या लोकांवर सकारात्मक परिणामहोतो?
- तुमच्या सहवासात लोकांना सकारात्मक दृष्टीकोण दिसतो का नकारात्मक? एक मित्र व एक कुटुंब सदस्य असे विचारुन पहा. तुम्हाला स्वतःला काय वाटते?
- एका ठिकाणी मांडी घालुन तुम्ही किती वेळ बसु शकता? तुमची बैठक किती आहे?
- कुठलीही साधना, ध्यान, एकाग्रता किंवा जप नियमित करता का?
- (आस्तिक असल्यास) मंदीरात किंवा प्रार्थनास्थळी कितीदा जातात का? (नास्तिक असल्यास) तुमच्या आत्मशांतीसाठी कायकरता?
- योग किंवा प्राणायाम किंवा ध्यान दररोजच्या दिनचर्येत करतात का?
- निसर्ग सानिध्यात एकांत वेळ महिन्यात कितीदा घालवता? (सेल्फीसाठी नव्हे, तर मनःशांतीसाठी)
- सामाजिक कार्यात तुमचा महिन्यात किती वेळ खर्च होतो?
- अध्यात्मिक प्रगतीसाठी कुठले अभ्यासक्रम/वर्ग/कोर्स/शिबीर केले आहेत का? याचा धर्माशी संबंध नसला तरी चालते.
- झोपेची वेळ किती ते किती आहे? रात्रि नियमित झोपमोड होते का? गाढ झोप लागते का?
- सतत झोप अपुरी झाली असे वाटते का? का नेहेमी उठल्यावर ताजेतवाने होतात ?
- अवांतर पुस्तकांचे वाचन दिवसातुन किती वेळ व किती नियमित करतात? (व्हॉट्सॲप फेसबुक सोडुन)
- पुस्तक वाचत असतांना तुम्ही एका बैठकीत न व्यत्यय येऊ देता (अगदी स्वतःच्या मोबाईलचा वापर किंवा पाणी पिण्यास उठणे नकरता) किती वेळ व किती पानं वाचता?
- नियमित वाचनात प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिंची आत्मचरित्र किंवा कथा कितपत असते?
- शेवटीचा (recently) ध्येयाने भावनिक होऊन तुम्ही आवाक्याबाहेरील यश संपादन करण्यास कधी प्रयत्न केला होता? इथे(Emotional Quotient) हा महत्वाचा दुवा आहे. तुम्ही जर भावनात्मक प्रेरणेने कार्य सुरु केले तर त्याला यश मिळण्याचीशक्यता जास्त असते.
वरील प्रश्नांची उत्तरे लिहुन त्यावर अभ्यास करा. पुढील लेखात आपण तितकेच खोलवर आहार व शरीराची मोजमापं घेणार आहोत.
#निरामय_आरोग्यवर्धिनी
आरोग्यवर्धिनी सेवक
© राहुल करुरकर
No comments:
Post a Comment